For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिद्धेश्वर ग्रॅनाईट बेळगाव टी-20 क्रिकेट स्पर्धेला प्रांरभ

09:51 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
सिद्धेश्वर ग्रॅनाईट बेळगाव टी 20 क्रिकेट स्पर्धेला प्रांरभ
Advertisement

बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित सिद्धेश्वर ग्रॅनाईट पुरस्कृत सिद्धेश्वर ग्रॅनाईट बेळगाव टी-20 साखळी क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. युनियन जिमखाना मैदानावर बेळगावात प्रथमच प्रकाश झोतात होणाऱ्या या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष व केएससी धारवाडचे माजी समन्वयक अविनाश पोतदार, स्पर्धा पुरस्कर्ते प्रमोद कदम, दीपक राजूकर, मिहीर पोतदार, नागेश मडिवाळ, जिमखाना अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, सचिव प्रसन्ना सुंठणकर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेत सहभागी संघांच्या मालकांचा सत्कार करण्यात आला. पेतदार रॉयल्सचे निशिल पोतदार, इंडियन बॉईज हिंडलगाचे काशिनाथ नाईक व रामचंद्र मनोळकर, के. आर. शेट्टी किंग्सचे प्रणय शेट्टीr, साईराज वॉरिअरचे महेश फगरे, रोहन ट्रेडर्स बीएससीचे ऋषिकेश कदम, सुपरएक्सप्रेस युनियन जिमखानाचे विठ्ठल गवस यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी चेतन बैलुरने सर्वांचे स्वागत केले. जिमखाना अध्यक्ष चंद्रकांत बंडगी व सचिव प्रसन्ना सुंठणकर यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे सन्मान केले. पाहुण्यांच्या हस्ते बीटीएल लोगो सह फुगे आकाशात सोडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी चषकांचे अनावरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेतील सामने दिवसा व रात्री खेळण्यात येणार असून पहिला सामना दुपारी 2.30 वाजता तर सायंकाळचा सामना सायंकाळी 6.30 वाजता सुरू होणार आहे सहभागी 8 संघात 28 साखळी सामने व चार- बाद पद्धतीचे सामने होणार असून स्पर्धेत एकूण 32 सामने होणार आहेत. सर्वसंघ तुल्यबळ असल्यामुळे सामने नक्कीच रंगदार तर होणाची अशा सर्व क्रिकेट प्रेमींनी व्यक्त केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.