For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिद्धांत अन् नव्याचा ब्रेकअप

07:00 AM Aug 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
सिद्धांत अन् नव्याचा ब्रेकअप
Advertisement

अमिताभ बच्चन यांची नात

Advertisement

चित्रपटसृष्टीत कधीकधी चित्रपटांपेक्षा अधिक चर्चा कलाकारांच्या रिलेशनशिपबद्दल होत असते. काही कलाकार स्वत:च्या रिलेशनशिपची जाहीर वाच्यता करत असतात. तर काही जण ते खासगी ठेवू इच्छितात. या यादीत सिद्धांत चतुर्वेदी आणि नव्या नवेली नंदा देखील सामील आहे. सिद्धांत आणि नव्याचे नाव दोन वर्षांपासून एकमेकांशी जोडले जात होते. परंतु आता त्यांचा ब्रेकअप चर्चेत आला आहे. गली बॉय चित्रपटामुळे प्रसिद्धीस आलेला अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी स्वत:चे खासगी आयुष्य सार्वजनिक करू इच्छित नाही. त्याने कधीच अमिताभ बच्चन यांची नात नव्यासोबतच्या रिलेशनशिपची अधिकृत पुष्टी केलेली नाही. नव्या अणि सिद्धांत यांना मूव्ही डेट्स, लंच-डिनर आणि व्हेकेशनवर एकत्र पाहिले गेल्यावर त्यांचे रिलेशनशिप चर्चेत आले होते.

2 वर्षांपर्यंत डेटिंगच्या वृत्तांमुळे प्रकाशझोतात राहणारी नव्या आणि सिद्धांत यांनी आता ब्रेकअप केला आहे. ब्रेकअपनंतरही ते चांगले मित्र राहणार आहेत. दोघांपैकी कुणीच याबद्दल सध्या अधिकृत माहिती दिलेली नाही. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात सिद्धांत नव्या नवेली नंदा आणि तिची आई श्वेता बच्चन यांना डिनरवर भेटला होता. सिद्धांत आणि श्वेता यांच्या भेटीने नव्या सोबतच्या त्याच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब झाले होते. परंतु आता त्यांच्या ब्रेकअपच्या वृत्तामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. नव्या ही अमिताभ बच्चन यांची नात आणि श्वेता बच्चन यांची मुलगी आहे. चित्रपटसृष्टीपासून दूर राहणारी नव्या उद्योगक्षेत्रात कार्यरत आहे. ती आरा हेल्थ नावाने एक हेल्थ प्लॅटफॉर्म संचालित करते. तिचे वडिल निखिल नंदा हे देखील उद्योजक आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.