पाच वर्षे सिद्धरामय्याच मुख्यमंत्री : राजण्णा
10:47 AM Oct 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेंगळूर : राज्याच्या राजकारणात बदलाचे वारे वाहू लागले असून आता माजी मंत्री के. एन. राजण्णा यांनी मुख्यमंत्री बदलाबाबत एक स्फोटक विधान केले आहे. मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा अधिकार ज्याला मिळतो तोच मुख्यमंत्री असतो. त्यामुळेच सिद्धरामय्याच पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री राहतील, असे विधान केले आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या फेरबदलावर मुख्यमंत्री बदलाचे भविष्य ठरवले जाईल. मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा अधिकार ज्याला मिळेल तो मुख्यमंत्री असेल. त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री राहतील. बिहार निवडणुकीनंतर हा बदल होईल, असेही राजण्णा यांनी स्पष्ट केले.
Advertisement
Advertisement