कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजारी शिक्षकांना मिळणार खास वैद्यकीय रजा

04:08 PM Apr 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची मडगावात घोषणा

Advertisement

मडगाव : गंभीर आजाराशी दोन हात करणाऱ्या शिक्षकांना यापूर्वी खास वैद्यकीय रजा मिळण्यास अडचणी निर्माण होत असे. अशा शिक्षकांना (टर्मिनल इलनेस) आता खास वैद्यकीय रजा मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल मडगावात केली. या घोषणेमुळे राज्यातील शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या संदर्भातील परिपत्रक लवकरच शिक्षण खाते जारी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. गोवा उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेतर्फे मडगाव रवींद्र भवनात आयोजित ‘कलागुरूजन 2025’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.

Advertisement

टर्मिनल इलनेस कुणाला होऊ नये. मात्र, चुकून कुणाला झाले तर अशा शिक्षकांना आता खास वैद्यकीय रजा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. टर्मिनल इलनेस सोडून अन्य काही आजार असल्यास अशी रजा मिळणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. शिक्षकांची वेतन श्रेणी व वैद्यकीय रजा असे दोन मुद्दे गोवा उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बाबाजी सावंत यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय रजेच्या मुद्द्याला स्पर्श करताना शिक्षकांना दिलासा दिला. मात्र, वित्त खात्याचा अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित नसल्याने शिक्षकांच्या वेतन श्रेणीचा मुद्दा नंतर सोडवू, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुलांचे भविष्य त्यांचे पालक किंवा सरकार नव्हे तर एक शिक्षकच ठरवू शकतो. गोव्याचा किंवा देशाचा विकास व्हायचा असेल तर तरूणांनी घडलं पाहिजे आणि यासाठी शिक्षकांचं योगदान महत्वाचं असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर, गोविंद पर्वतकर, गोवा उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बाबाजी सावंत, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अध्यक्ष भागीरथ शेट्यो, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर तसेच रवींद्र भवन मडगावचे उपाध्यक्ष मनोहर बोरकर उपस्थित होते. यावेळी बोलताना शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर म्हणाले की, सध्या राज्यात नवीन शिक्षण धोरण अंमलात आणले जात आहे. ज्यात पुस्तकी अभ्यासाबरोबरच गटचर्चा किंवा स्पर्धांवर अधिक भर दिला जाणार आहे. त्यामुळे मुलांच्या बौद्धिक वृद्धीला चालना मिळण्यास मदत होईल.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article