तिलोत्तमाशोमसोबत श्वेता त्रिपाठीची भागीदारी
‘मिर्झापूर
’ वेबसीरिज आणि ‘मसान’ चित्रपटात उत्तम अभिनय करणारी श्वेता त्रिपाठी आता नव्या क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. ती लवकरच निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण करणार आहे. ती आता ‘मुझे जान ना कहो मेरी जान’ या चित्रपटाची निर्मिती करणार असून याकरता तिने अभिनेत्री तिलोत्तमा शोमसोबत भागीदारी केली आहे. या चित्रपटात विचित्र प्रेमकहाणी दाखविली जाणार असून यात श्वेता आणि तिलोत्तमा दोघीही अभिनय करणार आहेत.
हा चित्रपट माझ्या मनाच्या खुपच जवळ आहे, याकरता याची कहाणी कारणीभूत आहे. प्रेमकहाण्या अत्यंत प्रामाणिक, सुंदर अन् सुक्ष्मतेने मांडल्या जाव्यात. या चित्रपटात तिलोत्तमा शोम अभिनय करणार असल्याने हा खास आहे. आम्ही एकत्र काम करण्यासाठी दीर्घकाळापासून इच्छुक होतो. तिच्याशिवाय हा प्रोजेक्ट मी सुरू करू शकले नसते, असे श्वेताने म्हटले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय नाग करणार आहे. श्वेता ही यापूर्वी ‘मसान’, ‘हरामखोर’, ‘द इलीगल’, ‘कार्गो’ आणि ‘कंजूस मक्खीचूस’ या चित्रपटांमध्ये दिसून आली आहे. तसेच अनेक सीरिजमध्ये तिने काम केले आहे. तर तिलोत्तमा ही ‘मान्सून वेडिंग’, ‘सर’, ‘शॅडोबॉक्स’, ‘ए डेथ इन द गूंज’ या चित्रपटांसह दिल्ली क्राइम, द नाइट मॅनेजर, पाताल लोक यासारख्या सीरिजमध्ये दिसून आली आहे.