कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कॅसिनो बंद करून दाखवा!

12:31 PM Mar 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विरोधी पक्षनेत्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान : 315 कोटी थकबाकी वसूल करण्याची मागणी

Advertisement

पणजी : विरोधकांनी कॅसिनोंचा विषय उपस्थित केला की लगेचच सरकार त्याचे खापर काँग्रेसवरच फोडण्याचे प्रयत्न करते. पण सरकारला जर खरोखरच तसे वाटत असेल तर सर्व कॅसिनो त्वरित बंद करून दाखवावे, असे खुले आव्हान विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना काल मंगळवारी विधानसभेत दिले. या कॅसिनोंमुळे आज देशभरात गोव्याचे नाव बदनाम होत आहे. कॅसिनो हीच गोव्याची ओळख आणि संस्कृती बनू लागली असून खरी संस्कृती नामशेष होऊ लागली आहे. तसेच कॅसिनोंमुळे अन्य सर्व वाईट आणि बेकायदेशीर गोष्टींनी येथे शिरकाव केला आहे, तसेच वेश्याव्यवसाय आणि गुन्हेगारी वाढली असल्याचे सांगत विरोधक आक्रमक बनले. युरी आलेमाव यांच्यासह, एल्टन डिकॉस्टा, विरेश बोरकर, व्हेंझी व्हिएगस आदींनी सरकारवर जोरदार टीकेच्या फैरी झाडल्या.

Advertisement

सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न

राज्यात ऑनशोअर आणि ऑफशोअर असे 15 कॅसिनो आहेत. त्यांच्याकडे 315 कोटीपेक्षा जास्त सरकारची थकबाकी आहे. ही थकबाकी कधी वसूल करणार असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. थकबाकीदार पैसे देत नसतील तर त्यांचे परवाने रद्द का करण्यात येत नाहीत? तसेच गेमिंग कमिशनर नियुक्तीचे आश्वासन सरकारने दिले होते त्याचे काय झाले? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित करून विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. नियमानुसार कारवाई करून थकबाकी वसूल केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दि. 31 मार्चपर्यंत कॅसिनोकडून 250 कोटी ऊपये थकबाकी वसूल करण्यात येईल. त्याशिवाय 100 कोटी ऊपये न्यायप्रविष्ट असून प्रकरणांच्या निकालानंतर 3 महिन्यांनी त्यांचीही वसुली होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

जीएसटीस, गेमिंग आयुक्तपद एकाच अधिकाऱ्याकडे 

गत 5 वर्षात म्हणजेच एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान ऑफशोअर आणि ऑनशोअर कॅसिनोंमधून ऊ. 1,418.82 कोटी कमावले आहेत. लाईव्ह गेमिंग प्रकारांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे सांगताना सरकारने लाईव्ह गेमिंगला परवानगी दिली नसल्याचे ते म्हणाले. तसेच जीएसटी आयुक्त हेच गेमिंग आयुक्त असतील, असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article