शुभमन गिलचा नेटमध्ये सराव
वृत्तसंस्था / कॅनबेरा
भारतीय संघातील फलंदाज शुभमन गिल याला दुखापतीमुळे पर्थच्या पहिल्या कसोटीत खेळता आले नव्हते. मात्र या दुखापतीतून तो आता पूर्णपणे बरा झाला असून शुक्रवारी त्याने नेटमध्ये फलंदाजीचा बराचवेळ सराव केला.
शुभमन गिल याला पर्थच्या पहिल्या कसोटीपूर्वी क्षेत्ररक्षणाचा सराव करताना हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला काही दिवस विश्रांती घ्यावी लागली. आता उभय संघातील दुसरी कसोटी 6 डिसेंबरपासून खेळविली जाणार असून या कसोटीत शुभमन गिल आणि कर्णधार रोहीत शर्मा यांचे पुनरागमन होणार आहे. गिलने शुक्रवारी येथे सुमारे तासभर फलंदाजीचा सराव नेटमध्ये केला. शनिवारपासून ओव्हल येथे भारत आणि पंतप्रधान इलेव्हन यांच्यात दोन दिवसांचा सामना खेळविला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघ दुसऱ्या कसोटीपूर्वी फलंदाजीचा अधिक सराव करेल. दुसऱ्या कसोटीत जैस्वालसमवेत कर्णधार रोहीत शर्मा सलामीला फलंदाजीसाठी येईल. त्यामुळे के. एल. राहुलला कदाचीत पाचव्या स्थानावर फलंदाजी करावी लागेल, असा अंदाज आहे. मात्र पडिकलला दुसऱ्या कसोटीसाठी वगळण्यात येईल.