For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी शुभमन गिल कर्णधार

06:45 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी  शुभमन गिल कर्णधार
Advertisement

तुषार देशपांडे, अभिषेक शर्मा, रियान परागला संधी : रोहित शर्मा, विराट कोहलीला विश्रांती

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी बीसीसीआयकडून टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. संघाच्या नेतृत्वाची धुरा युवा शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान, टीम इंडियाच्या सर्व सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असल्याची माहिती बीसीसीआयमधील सूत्रांनी दिली. भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध पाच सामन्याची टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेला 6 जुलैपासून प्रारंभ होईल. यंदाच्या टी 20 विश्वषकानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघ झिम्बाब्वे दौरा करणार आहे. ज्यामध्ये टीम इंडिया पाच टी 20 सामने खेळणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने सोमवारी भारतीय संघाची घोषणा केली, ज्यामध्ये नव्या खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रियान पराग, तुषार देशपांडे, नितीश रेड्डी, रिंकू सिंग, संजू सॅमसन, ध्रुव जुरेल, आणि रवी बिश्नोई यांना संघात स्थान देण्यात आले आहे. इशान किशन व श्रेयस अय्यर यांचे मात्र टीम इंडियात कमबॅक झालेले नाही. दुसरीकडे, आगामी काळातील व्यस्त वेळापत्रक पाहता कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, मोहम्मद सिराज या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. हे सर्व खेळाडू वर्ल्डकपनंतर मायदेशी परतणार आहेत.

Advertisement

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ - शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे.

  • झिम्बाब्वे दौऱ्याचे वेळापत्रक
  • पहिली टी 20       भारत वि झिम्बाब्वे 6 जुलै, हरारे
  • दुसरी टी 20         भारत वि झिम्बाब्वे 7 जुलै, हरारे
  • तिसरी टी 20       भारत वि झिम्बाब्वे 10 जुलै, हरारे
  • चौथी टी 20          भारत वि झिम्बाब्वे 13 जुलै, हरारे
  • पाचवी टी 20       भारत वि झिम्बाब्वे 14 जुलै, हरारे.

Advertisement
Tags :

.