For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शुभंकरचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त

06:04 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
शुभंकरचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त
Advertisement

वृत्तसंस्था/ ग्रेझ (ऑस्ट्रिया)

Advertisement

येथे सुरु असलेल्या ऑस्ट्रिया खुल्या आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या शुभंकर डे चे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाले.

पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात इंडोनेशियाच्या प्रदिष्का सुजिओने शुभंकर डे चा 21-17, 21-15 अशा सरळ गेम्समध्ये केवळ 42 मिनिटात पराभव करत अंतिम फेरी गाठली. शुभंकर डे ने 2018 साली सेरलोर लक्स खुली सुपर 100 दर्जाची बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती. तसेच मनिला येथे 2020 साली झालेल्या आशिया सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱ्या भारतीय पुरुष संघामध्ये शुभंकरचा समावेश होता. ऑस्ट्रियातील या स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या टी. एस. रवीकृष्णा आणि अक्षण शेट्टी यांचे तर मिश्र दुहेरीत संजिआ धनराज आणि के. मनिषा यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले.

Advertisement

Advertisement
Tags :

.