कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘तन्वी द ग्रेट’मध्ये शुभांगी

06:37 AM May 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काजोलने करून दिली ओळख

Advertisement

बॉलिवूड अभिनेत्री काजोलने अनुपम खेर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार चित्रपट ‘तन्वी द ग्रेट’ची मुख्य  अभिनेत्री शुभांगीला सर्वांसमोर सादर केले आहे. या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये केला जाणार आहे.

Advertisement

अनुपम खेर यांनी शुभांगीला स्वत:चा आगामी दिग्दर्शित चित्रपट ‘तन्वी द ग्रेट’ची मुख्य नायिका म्हणून सादर पेल आहे. काजोलने एका विशेष कार्यक्रमादरम्यान तन्वीचा फर्स्ट लुक टीझर सादर केला. आतापर्यंत चित्रपट ‘तन्वी द ग्रेट’मधून मुख्य अभिनेत्रीचे नाव गुप्त ठेवण्यात आले होते. टीझरमध्ये केवळ संगीतासोबत तन्वीचा लुक सादर करण्यात आला होता.

अनुपम खेर यांच्या अभिनयाच्या शाळेत शिक्षण

शुभांगीला अनुपम खेरच्या प्रसिद्ध अॅक्टिंग स्कूल अॅक्टर प्रिपेयरमधून निवडण्यात आले होते. जेथे तिने अनेक वर्षांपर्यंत मोठ्या प्रमाणावर अभिनय आणि याच्याशी संबंधित सर्व गोष्टींचे प्रशिक्षण घेतले आहे. तन्वी द ग्रेट हा अनुपम खेर यांच्याकडून दिग्दर्शित दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी अनुपम यांनी 23 वर्षांपूर्वी ‘ओम जय जगदीश’ दिग्दर्शित केला होता.

Advertisement
Next Article