शुभम देबनाथने गोव्याला दिले योगामध्ये सुवर्णपदक
मडगाव : मूळ पश्चिम बंगालचा मात्र आता राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शुभम देबनाथने यजमान संघाने योगामध्ये सुवर्णपदक मिळवून दिले. कांपाल येथील क्रीडा ग्राममध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. काल पारंपरिक योगा प्रकारात गोव्याला हे सुवर्णपदक शुभमने मिळविले. गुजरातात झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शुभमला रौप्यपदक मिळाले होते. यंदा मात्र प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर शुभमने सुवर्ण खेचून आणले. गोव्याचे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील हे बारावे पदक आहे. 20 वर्षीय शुभमने योगा आणि जिम्नेस्टिक्समध्ये राष्ट्रीय पातळीवर कित्येक पदके मिळविली आहेत. राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतही शुभमने सुवर्णपदक जिंकले होते. एक वर्षभर शुभम डिचोलीतील झांट्यो हॉलमध्ये योगा खेळाचे प्रशिक्षक दौलसाब वतारच्या मार्गदर्शनाखाली सराव दिवसभरातून 10 तास सराव करता होता. गुजरातात माझे सुवर्ण काही गुणांनी हुकले होते. यंदा मात्र फक्त सुवर्णपदकाचे ध्येय समोर होते. मेहनतीचे फळ मिळाले, असे यावेळी शुभम देबनाथ म्हणाला.