For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीपाद नाईक यांनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट

12:58 PM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रीपाद नाईक यांनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट
Advertisement

जुन्या आठवणींना दिला उजाळा

Advertisement

पणजी : उत्तर गोवा खासदार आणि केंद्रीय ऊर्जा, अक्षय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांच्याशी जिव्हाळ्याने चर्चा केली. अडवाणी गोव्यात अनेक वेळा आले आहेत. त्यावेळी नाईक व अडवाणी यांची सातत्याने भेट होत असे. त्यांचे सख्य फार जुने आणि अतूट आहे. त्याच भावनेतून नाईक हे अडवाणींच्या भेटीसाठी गेले. दोघांनी चर्चेतून जुन्या आठवणींना उजाळा दिला. गोव्याच्या सध्यस्थितीबाबत अडवाणींनी विचारपूस केली. नाईक यांनी खासदार झाल्यानंतर आणि मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अडवाणी यांना भेटून त्यांची विचारपूस केली. अडवाणींना देखील नाईक यांच्या भेटीने आनंद झाला. अन्य काही नेत्यांच्याही त्यांनी गाठीभेटी घेतल्या.

श्रीपादभाऊ आज गोव्यात येणार

Advertisement

उत्तर गोव्यातून सलग सहाव्यावेळी निवडून येण्याचा विक्रम करणारे गोव्याचे लोकनेते सर्वांचे लाडके श्रीपादभाऊ नाईक  मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आता आज शनिवार दि. 15 जून रोजी सायंकाळी 5.30 वा. गोव्यात दाखल होत आहेत. श्रीपाद नाईक यांचे कार्यकर्ते आणि चाहते त्यांचे दाबोळी विमानतळावर स्वागत करतील. विमानतळावरुन श्रीपादभाऊ त्यांच्या सांपेद्र, ओल्ड गोवा येथील निवासस्थानी जातील.

Advertisement
Tags :

.