महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लोकसभेसाठी उत्तरेतून श्रीपाद नाईक ?

11:34 AM Feb 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे श्रीपाद नाईक यांचे एकच नाव उमेदवारीसाठी असल्याने त्यांचे तिकीट निश्चित झाल्यात जमा आहे. तथापि दक्षिण गोव्यातून 4 नावे असल्याने तेथे उमेदवारीसाठी भाजपमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिल्लीत पाचारण करण्यात येऊन त्यांनी भाजप पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला दक्षिण गोव्यातून पराभवाचा फटका बसला होता. तेथे विजयी होण्यासाठी भाजपने कंबर कसली असून तेथील मतदारसंघात ख्रिस्ती मतदार तसेच एसटीची लोकसंख्या जास्त असल्याने एसटी नेत्याला प्राधान्य देण्याचा विचार भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने चालवला आहे. दक्षिणेतून नरेंद्र सावईकर, दिगंबर कामत, बाबू कवळेकर, रमेश तवडकर अशी चार नावे देण्यात आली आहेत. त्यामुळे तेथे चार जणांची मोठी स्पर्धा लागली आहे. एसटी समाजाचा विचार केल्यास तेथे तवडकर किंवा कवळेकर यांना उमेदवारीची मोठी संधी असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

दक्षिणेतून बाबू कवळेकर ?

Advertisement

कामत व तवडकर हे विद्यमान आमदार असून त्यांच्यापैकी एकाची उमेदवारीसाठी निवड झाल्यास आणि ते विजयी ठरल्यास पुन्हा त्यांच्या मतदारसंघात विधानसभा पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे तर सावईकर व कवळेकर यांना उमेदवारी मिळाली तर पोटनिवडणुकीचा प्रश्नच उद्भवणार नाही. या परिस्थितीत कवळेकर यांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article