Pandharpur : कार्तिकी एकादशीला पूर्वपरंपरेप्रमाणे निघाली श्री विठ्ठलाची रथयात्रा
कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रथयात्रा उत्साहात
by चैतन्य उत्पात
पंढरपूर : पंढरपूर शहरातील प्रदक्षिणा मार्गावरून परंपरेनुसार रविवार, २ नोव्हेंबर रोजी कार्तिकी प्रबोधिनी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी, राही यांची रथयात्रा काढण्यात आली. पूर्वपरंपरेप्रमाणे ही रथयात्रा झाली.
श्री विठ्ठलाची रथयात्रा दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास खाजगीवले धर्मशाळा येथून निघाली. पेशवाई काळात गोविंदपंत खाजगीबले हे पेशव्यांचार सरदार आजच्या माहेश्वरी धर्मशाळेत वास्तव्यास होते. पूर्वीच्या काळीही पंढरपूर येथे आषाढी व कार्तिकी एकादशीला भाविकांची मोठी गर्दी होत असे.
या प्रचंड गर्दीमुळे अनेक भाविक दर्शनापासून वंचित राहत असत, गोबिंदपंत खाजगीवले यांना श्री विठ्ठलाने स्वप्नात दृष्टांत दिला आणि अनेकांना दर्शन होत नसल्याने प्रत्येक आषाढी एकादशीला रथयात्रा काढून ज्यांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येत नाही, अशा भाविकांना दर्शनाचा लाभ रथयात्रेद्वारे घडू द्यावा, असे सांगितले.
श्री पोहरंग राही रखुमाई रथ तेव्हापासून म्हणजे सुमारे २५० वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे, या रथावर बसण्याचा मान पंढरपूर येथील नातू, रानडे, भाटे, देवधर या खाजगीवले यांच्या नातेवाईकांना आहे,