For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकसभेसाठी अर्ज भरण्याचा श्रीगणेशा

11:28 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
लोकसभेसाठी अर्ज भरण्याचा श्रीगणेशा
Advertisement

पहिल्याच दिवशी एक अर्ज दाखल : निवडणूक खर्च निरीक्षकांचीही नियुक्ती

Advertisement

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. शुक्रवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी उत्तम प्रजाकीय पक्षाच्या उमेदवाराने अर्ज भरला आहे. पहिल्या दिवशी केवळ एक अर्ज दाखल झाला आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी ही माहिती दिली आहे. उत्तम प्रजाकीय पक्षाचे मल्लाप्पा चन्नाप्पा चौगला यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता या प्रक्रियेला सुरुवात झाली. दुपारी 3 पर्यंत केवळ एकच अर्ज दाखल झाला आहे.

 निरीक्षक नागरिकांनाही भेटणार

Advertisement

दरम्यान, बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. अरभावी, गोकाक, बेळगाव उत्तर व दक्षिण मतदारसंघासाठी हरकृपाल खटाना यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा मोबाईल क्र. 7259751395 हा आहे. सर्किट हाऊसमधील 4 नंबर दालनात सकाळी 10 ते 11 या वेळेत ते नागरिकांना भेटणार आहेत. बेळगाव ग्रामीण, बैलहोंगल, सौंदत्ती यल्लम्मा व रामदुर्ग मतदारसंघासाठी नरसिंगराव बी. यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा मोबाईल क्र. 7348921395 असा आहे. सर्किट हाऊसमधील 9 नंबर दालनात सकाळी 10 ते 11 या वेळेत ते नागरिकांना भेटणार आहेत. निवडणूक आयोगाने त्यांची नेमणूक केली असून ते बेळगावात दाखल झाले आहेत.

Advertisement
Tags :

.