For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्री गणेशकडे तुरमुरी क्रिकेट चषक

11:09 AM Nov 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
श्री गणेशकडे तुरमुरी क्रिकेट चषक
Advertisement

वार्ताहर /उचगाव

Advertisement

तुरमुरी येथील श्रीगणेश स्पोर्ट्स यांच्या विद्यमाने तुरमुरी प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात श्री गणेश स्पोर्ट्स संघाने जय स्पोर्ट्स संघाचा 8 गड्यानी पराभव करून तुरमुरी प्रीमियर चषक पटकाविला. सदर स्पर्धेमध्ये एकूण आठ संघानी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात  श्री गणेश स्पोर्ट्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतले. जय स्पोर्ट्सने 8 षटकात 47 धावा केल्या. त्यानंतर श्रीगणेश स्पोर्ट्सने दोन गड्यांच्या मोबदल्यात  सहज विजय मिळवला. उत्कृष्ट फलंदाज केवल राजूकर, उत्कृष्ट गोलंदाज भारत बांडगे, चाळीस वर्षावरील खेळाडू डॉ. विठ्ठल बांडगे 160 धावा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक केतन खांडेकर, अंतिम सामन्यातील सामनावीर भारत बांडगे, अध्यक्षस्थानी नागराज जाधव  होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.