For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्री गणेश जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेला प्रारंभ

10:03 AM Sep 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्री गणेश जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेला प्रारंभ
Advertisement

स्पर्धेत 200 हून अधिक स्पर्धकांचा सहभाग

Advertisement

बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ झेंडा चौक, मार्केट व बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 20 व्या श्री गणेश जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धाना उत्साहात प्रारंभ झाला. रामनाथ मंगल कार्यालय भाग्यनगर येथे आयोजित केलेल्या मार्केट झेंडा चौक गणेशोत्सव मंडळातर्फे गेली 19 वर्षे ही शरीरसौष्ठव स्पर्धा नियमीत भरवली जाते. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे शिरीष गोगटे, अविनाश पोतदार, डॉ. रवी पाटील, आशियाई पंच अजित सिद्दण्णवर, सचिन हंगिरगेकर, विशाल मुरकुंबी, मोतीचंद दोरकाडी, राहुल चौगुले, विनायक पाटील, कृष्णमूर्ती एस., विजय तलवार, अमित किल्लेकर, राजू हंगिरगेकर, एम. गंगाधार, हेमंत हावळ, श्रीराम कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. गणेशमूर्तींचे पूजन शिरीश गोगटे यांच्या हस्ते, हनुमान मूर्तींचे पूजन डॉ. रवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सदर स्पर्धेत जवळपास 200 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.