For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

श्री देव उपरलकराचा वाढदिवस 1 फेब्रुवारीला

12:44 PM Jan 18, 2024 IST | अनुजा कुडतरकर
श्री देव उपरलकराचा वाढदिवस 1 फेब्रुवारीला

सावंतवाडी,18 जानेवारी (प्रतिनिधी)-
महाराष्ट्र व गाेवा राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या, सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान व 365 खेडयांचा अधिपती असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा साेहळा गुरुवार 1 फेब्रुवारी 2024 राेजी साजरा हाेणार आहे.सावंतवाडीतील राजघराण्याचे दैवत असलेल्या या देवस्थानचा वाढदिवस दरवर्षी माेठा उत्सव म्हणून साजरा हाेताे.यावर्षीही त्या निमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे.गुरुवार 1फेब्रुवारी राेजी सकाळी अभिषेक व पूजा, उत्सवानिमित्त पूजापाठ, त्यानंतर सर्व भाविकांना दर्शन व तिर्थप्रसाद,नामांकीत भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम हाेणार आहे. तर सायंकाळी 7 वाजता सावंतवाडी येथील महापुरुष दशावतार नाटयमंडळाचा नाटयप्रयाेग हाेणार आहे. या कार्यक्रमाला सर्व भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री देव उपरलकर देवस्थानचे मानकरी विद्याधर नाईक शितप व शुभम नाईक शितप यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.