कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्री दामोदर पर्वणीला उत्साहात प्रारंभ

12:26 PM Jul 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संगीत मैफिली पहाटेपर्यंत रंगल्या : लाखो भाविकांनी घेतले देवदर्शन

Advertisement

वास्को : श्री दामोदर भजनी सप्ताहाला काल बुधवारी दुपारी भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. उद्योजक प्रशांत जोशी यांनी श्रीदामोदर चरणी श्रीफळ ठेवून सप्ताहाला विधिवत प्रारंभ केला. त्यानंतर उपस्थित भजनी कलाकारांनी भजनाचे सूर आळवले. या भजनी सप्ताहाची सांगता आज दुपारी श्रीफळ विसर्जन व गोपाळकाल्याने होणार आहे. बुधवारी दुपारी साडेबाराच्या ठोक्याला श्रीचरणी श्रीफळ अर्पण करताच अशोक मांद्रेकर यांनी ‘हरि जय जय राम...’ च्या सूराने पारंपरिक भजनाची सुरुवात केली. बाबू गडेकर, शशी उसगांवकर व स्थानिक भजनी कलाकारांनी आपापले अभंग सादर केले. यावेळी महेंद्र बांदेकर, अनिल पंडित, भगवान हरमलकर, सुरेश वेळगेकर व इतरांनी साथसंगत केली. त्यांना हार्मोनियमवर अनिल कोंडुरकर, राजेंद्र बोरकर यांनी तर पखवाजावर सुर्या शेट्यो, विनोद मयेकर व इतरांनी साथ केली. तद्नंतर स्थानिक भजनी पथकांच्या साखळी भजनाला प्रारंभ झाला. अखंड भजनाच्या प्रारंभावेळी भजनी कलाकारांसह आमदार संकल्प आमोणकर, आमदार कृष्णा (दाजी) साळकर, नगरसेवक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

अनेक मान्यवरांनी घेतले दर्शन 

यंदा भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. दुपारनंतर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. संध्याकाळ ते पहाटेपर्यंत वास्कोतील विविध ठिकाणांवरून दिंड्यांसह पार मंदिराकडे मार्गस्थ झाले. जेटी सडा येथून मुरगांव बंदर फैलवाले कामगार संघाचा पहिला ‘समुद्रमंथन’ पार दिंडीसह हरिनामाचा गजर करीत व टाळ मृदंगाच्या निनादात मंदिराकडे मार्गस्थ झाला. त्यानंतर नाभिक समाजाचा, श्री दामोदर भजनी सप्ताह उत्सव समितीचा व त्यानंतर दैवज्ञ ब्राह्मण समाज, विश्वकर्मा ब्राह्मण समाज व गाडेकार समाज यांचे चलचित्रीत पार भजनी दिंडीसह मंदिराकडे मार्गस्थ होत राहिले. दुपारनंतर मान्यवरांनीही दामोदराचे दर्शन घेतले. प्रसिद्ध भजनी कलाकारांसह पर्यटनमंत्री रोहन खवंटे, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्यासह अनेक मान्यवरांनी रात्री उशिरापर्यंत दर्शन घेतले.

गायन बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद

दिंडीच्या मार्गात नटराज थिएटर समोरील मंडपात, टॅक्सी स्टॅण्ड व मुरगाव पालिका गणेश मंडपात विविध समाजातर्फे आमंत्रित केलेल्या नामवंत गायक कलाकारांच्या मैफली पहाटेपर्यंत रंगतदार ठरल्या. श्रोत्यांनी आपल्या आवडत्या गायकांच्या बैठकींना उपस्थिती लावून संगीत मैफलींचा मनमुराद आस्वाद घेतला. गायनाच्या बैठकांना श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. मुरगाव हिंदू समाजाने आयोजित केलेल्या वार्षिक अन्नदान उपक्रमालाही हजारो भाविकांचा प्रतिसाद लाभला. अखंड भजनी सप्ताहाची आज दुपारी गोपाळकाल्याने उत्साहात सांगता होणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article