भारत अ संघाच्या कर्णधारपदी श्रेयस अय्यर
ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध होणार दोन अनधिकृत कसोटी, 16 पासून प्रारंभ
वृत्तसंस्था/ मुंबई
कसोटी मालिका व आशिया चषक स्पर्धेसाठी दुर्लक्ष करण्यात आलेल्या श्रेयस अय्यरला ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध होणाऱ्या दोन अनधिकृत कसोटी मालिकेसाठी भारत अ संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. लखनौमध्ये या कसोटी होणार आहेत.
यातील दुसऱ्या कसोटीसाठी वरिष्ठ खेळाडू केएल राहुल व मोहम्मद सिराज उपलब्ध होणार आहे. येत्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक टी-20 स्पर्धेसाठी श्रेयसला राखीव खेळाडूंतही स्थान देण्यात आले नव्हते. सध्या तो दुलीप करंडक स्पर्धेत पश्चिम विभाग संघातून मध्यविभागाविरुद्ध उपांत्य सामना खेळत आहे. ऑस्ट्रेलिया अ विरुद्धची पहिली अनधिकृत कसोटी 16-19 सप्टेंबर, दुसरी कसोटी 23-26 सप्टेंबर या कालावधीत एकाना स्टेडियमवर होणार आहे. इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीवेळी जखमी झालेल्या करुण नायरलाही या संघात घेण्यात आलेले नाही. यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे. केएल राहुल व सिराज दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध होतील. ऑस्ट्रेलिया अ संघात अनेक कसोटीपटूंचा समावेश असून त्यात काही नवोदित खेळाडूंचाही समावेश आहे.
भारत अ संघ : श्रेयस अय्यर, कर्णधार, अभिमन्यू ईश्वरन, एन. जगदीशन, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, हर्ष दुबे, आयुश बडोनी, नितिश कुमार रे•ाr, तनुश कोटियन, प्रसिद्ध कृष्णाण्, गुरनूर ब्रार, खलील अहमद, मानव सुतार, यश ठाकुर.