महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मडकई येथील श्री नवदुर्गा जत्रोत्सवाची भाविकांच्या अलोट गर्दीत रथोत्सवाने सांगता

11:57 AM Dec 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पोलीस बंदोबस्तात पहाटे व सायंकाळी रथोत्सव उत्साहात

Advertisement

फोंडा : मडकई येथील प्रसिद्ध श्री देवी नवदुर्गेच्या जत्रोत्सवाची सांगता गुरूवारी पहाटे व त्यानंतर सायं. 4 वा भाविकांच्या अलोट गर्दीत झालेल्या रथोत्सवाने झाली. देवीचा रथ नाचविण्यात भाविक व ग्रामस्थांनी देहभान हरपून दंग झाल्याचे चित्र सद्या सर्वत्र मोबाईल स्टेटवर दिसत आहे.  राज्यभरातील कानाकोपऱ्यातून भाविकांनी पहाटे रथोत्सवात सहभागी झाले होते. जत्रोत्सवानिमित्त देवी नवदुर्गेच्या आशिर्वाद घेण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर, कॉग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी रथोत्सवात सहभाग घेऊन देवीचे आशिर्वाद घेतले. युवाईमध्येही जत्रोत्सवाची क्रेझ पाहायल मिळाली. रथोत्सवाची छबी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात साठवूत तर काहींनी सेल्फी काढून देवी नवदुर्गेचे रूप आपल्या मोबाईलमध्ये बंदिस्त करून आशिर्वाद घेतले. श्री देवी नवदुर्गा नवसाला पावणारी देवी म्हणून भाविकांची श्रद्धा आहे. मडकईच्या नवदुर्गा देवस्थानचा वाद सध्या न्यायप्रविष्ट असून मामलेदाराच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तात हा जत्रोत्सव साजरा करण्यात आला. भाविकांच्या अलोट गर्दीत कोणतीच घाईगडबडीशिवाय रथोत्सव सुरळीत पार पडला. गावातील नागरिकांनी एकजुटीने आणि एकोप्याने जत्रोत्सव संपन्न झाला.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article