For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रावणमासाला भक्तिभावाने सुरुवात

10:47 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रावणमासाला भक्तिभावाने सुरुवात
Advertisement

खानापूर तालुक्यातील शिवालयांत विशेष पूजा : मंदिरांमध्ये भक्तांची दर्शनासाठी अलोट गर्दी

Advertisement

खानापूर : सोमवारपासून श्रावणाला सुरुवात झाली आहे. यावर्षी श्रावण महिन्याला सोमवारपासून सुरुवात होत असल्याने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रावण सोमवारनिमित्त शहरासह तालुक्यातील शिवालयांतून विशेष पूजा करण्यात आली. भाविकांनी शिवालयात जाऊन पूजा, अभिषेक करून महादेवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. पहिल्याच सोमवारी दोन महिन्यानंतर पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने उत्साहाचे वातावरण पसरले होते. पहिल्याच दिवशी श्रावणाचा अनुभव तालुक्यातील जनतेला मिळाला. सकाळी काहीवेळ पावसाच्या सरी येऊन गेल्यानंतर सकाळी 10 पासून पूर्णपणे उन्ह पडले होते. त्यामुळे महादेव मंदिरांतून भक्तांची गर्दी दिसून येत होती. सकाळपासूनच पुजेचे साहित्य घेऊन भक्तमंडळी मंदिरात जाताना दिसून येत होती. शहरातील नदीकिनारी असलेल्या पंचमुखी महादेव, कलमेश्वर मंदिर, हेस्कॉम कार्यालयाच्या आवारात असलेल्या उमा, महेश मंदिरात तसेच असोगा येथील रामलिंग देवस्थान, तीर्थकुंडये येथील महादेव देवस्थान तसेच चापगाव, हलशी यासह विविध गावांमधील महादेव मंदिरांतून विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते.

पावसाची उघडीप मिळाल्याने बाजारात गर्दी

Advertisement

पहाटे अभिषेक, त्यानंतर पूजा करण्यात आली होती. असोगा येथील रामलिंग देवस्थानात श्रावण सोमवारनिमित्त रुद्राभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते. श्रावणाचा पहिला सोमवार असल्याने तसेच पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने बाजारात एकच गर्दी दिसून येत होती. शुक्रवारी नागपंचमी असल्याने नागपंचमीसाठी लागणारे साहित्य तसेच फराळाचे लाडू, लाह्या यांची विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत होती.

Advertisement
Tags :

.