For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रावण तोंडावर...मांसाहाराची चंगळ

10:59 AM Aug 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रावण तोंडावर   मांसाहाराची चंगळ
Advertisement

मटण, चिकन, मासळीला पसंती : मागणीत वाढ 

Advertisement

बेळगाव : श्रावणमास अगदी तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने मटण, चिकन, अंडी, बांगडे व खेकड्यांना मागणी वाढली आहे. सोमवार दि. 5 ऑगस्टपासून श्रावणमासाला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर मांसाहार खवय्यांची चंगळ पाहावयास मिळत आहे. शहरासह ग्रामीण भागात मटण आणि चिकन दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. विशेषत: श्रावणमासात मांसाहार वर्ज्य केला जातो. त्यामुळे आता अधिक पसंती दिली जात आहे. विशेषत: सोमवारपासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात पूजा-अर्चा आणि धार्मिक कार्यक्रमांना महत्त्व दिले जाते. शहरात मंगळवारी आणि बुधवारी मोठ्या प्रमाणात मांसाहारची विक्री झाली. त्याचबरोबर येत्या दोन दिवसांत मागणी वाढेल. सध्या मटण, चिकन आणि फिश मार्केटमध्ये खरेदी वाढू लागली आहे. मटण 700 रु. किलो, चिकन 210 रु. किलो, अंडी 480 रु. शेकडा तर बांगडा 300 ते 350 रु. किलो असा दर आहे. श्रावणमासाला केवळ तीन दिवसांचा कालावधी असल्याने मांसाहार प्रेमींकडून आताच ताव मारण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे श्रावण तोंडावर आणि मांसाहाराची चंगळ, असे चित्र पाहावयास मिळत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.