For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनोख्या भूमिकेत दिसणार श्रद्धा

06:34 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
अनोख्या भूमिकेत दिसणार श्रद्धा
Advertisement

टाइम ट्रॅव्हलवर आधारित चित्रपट

Advertisement

श्रद्धा कपूरचा ‘स्त्राr 2’ हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसादही मिळाला आहे. श्रद्धा आता टाइम ट्रॅव्हलवर आधारित चित्रपटात काम करणार आहे. यात ती नागिणीच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समजते.

या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. तसेच उर्वरित कलाकारांविषयी माहिती देखील समोर आलेली नाही. परंतु या चित्रपटात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असणार हे निश्चित आहे. ‘नागिन’ नावाचा चित्रपट किंवा चित्रपटात नागिणीच्या भूमिकेत ती दिसून येईल. अशाप्रकारची भूमिका यापूर्वी श्रीदेवी यांनी साकारली होती.

Advertisement

श्रद्धा कपूरच्या या नव्या चित्रपटाची निर्मिती निखिल द्विवेदी करणार आहेत. तर याचे दिग्दर्शन विशाल फुरिया करतील. तर ‘अदित्यम’ या चित्रपटातही श्रद्धा दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कुणाल देशमुख करतील. या चित्रपटात तिच्यासोबत अदिती राव हैदरी आणि निधि अग्रवाल या अभिनेत्रीही दिसून येतील.

Advertisement
Tags :

.