कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्रद्धा आर्याने दिला जुळ्यांना जन्म

06:10 AM Dec 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

व्हिडिओ केला शेअर

Advertisement

अभिनेत्री श्रद्धा आर्याने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. या जुळ्यांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे. कुंडली भाग्य मालिकेतील अभिनेत्री श्रद्धाने रुग्णालयातून पहिली झलक शेअर केली आहे. श्रद्धाने इन्स्टाग्रामवर मातृत्वाचा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे. माझे कुटुंब आता पूर्ण झाल्याचे तिने नमूद केले आहे.

Advertisement

श्रद्धा या व्हिडिओत दोन्ही अपत्यांना मांडीवर घेऊन बसलेली असल्याचे दिसून येते. दोन निरागस आनंदांनी आमच्या परिवाराला पूर्ण केले आहे. आमचे मन आता डबल फुल असल्याचे तिने म्हटले आहे.  अभिनेत्रीचे अन्य कलाकारांनी अभिनंदन केले आहे. रिद्धिमा पंडित, दीप्ति भटनागर, माही विज, पवित्रा पूनिया, धीरज धूपर यासारख्या कलाकारांचा यात समावेश आहे.

श्रद्धा आर्याने नौदलाचे अधिकारी राहुल शर्मासोबत 2021 मध्ये विवाह केला होता. राहुलसोबत विवाह करण्यापूर्वी श्रद्धाचा एक साखरपुडा मोडला होता, तिला ब्रेकअपच्या दु:खाला सामोरे जावे लागले होते. श्रद्धा ही टीव्ही क्षेत्रातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article