For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रद्धा दाखवा...आक्रमकता नको; पंतप्रधान मोदींची मंत्र्यांना विशेषकरून सूचना

06:50 AM Jan 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रद्धा दाखवा   आक्रमकता नको  पंतप्रधान मोदींची मंत्र्यांना विशेषकरून सूचना
Advertisement

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेवरून पंतप्रधान मोदींची मंत्र्यांना सूचना

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलिकडेच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांना अनेक कठोर निर्देश दिले आहेत. अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना विशेषकरून सूचना केली आहे. श्रद्धा दाखवा, परंतु आक्रमकता नको असे मोदींनी बैठकीत स्पष्टपणे सांगितले आहे.

Advertisement

पंतप्रधान मोदींनी स्वत:च्या मंत्र्यांना कुठल्याही प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. मंत्र्यांनी सरकारच्या मर्यादेची काळजी घ्यायला हवी. मंत्र्यांनी स्वत:च्या मतदारसंघात प्राणप्रतिष्ठेदरम्यान कुठल्याही प्रकारच गडबड होऊ नये याची काळजी घ्यावी असे पंतप्रधानांनी सांगितले आहे.

स्वत:च्या भागातील लोकांना 22 जानेवारीनंतरच रामलल्लाचे दर्शन घडविण्यासाठी आणावे, अधिकाधिक लोकांना भगवान श्रीरामाचे आशीर्वाद मिळवून द्या, असे पंतप्रधानांनी मंत्र्यांना उद्देशून म्हटले आहे. 22 जानेवारी रोजी राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याकरता निवडक लोकांनाच निमंत्रित करण्यात आले आहे. तरीही मोठ्या संख्येत लोक अयोध्येत पोहोचू शकतात अशी शक्यता आहे. याचमुळे पंतप्रधान मोदींनी स्वत:च्या मंत्र्यांना अशाप्रकारचे निर्देश दिले आहेत.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात 125 संत परंपरांचे संत-महात्मे उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर 13 अखाडे तसेच 6 सनातन दर्शनाचे धर्माचार्य देखील या सोहळ्यात भाग घेणार आहेत. देशाच्या विविध क्षेत्रांशी संबंधित अडीच हजार लाकंना आमंत्रित करण्यात आले आहे. याकरता विशेष व्यवस्था केली जात आहे. तसेच 50 देशांमधून सुमारे 100 अतिथी देखील अयोध्येत पोहोचणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिली आहे.

देशविदेशात होणार थेट प्रसारण

देशातील सर्व राज्यांसोबत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचे प्रसारण विदेशात विविध भारतीय दूतावासांमध्ये देखील केले जाणार आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात टाइम्स स्क्वेअरवर 22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रसारण होणार आहे. तसेच या ऐतिहासिक दिनी पंतप्रधान मोदी हे देशविदेशातील रामभक्तांना संबोधित करणार आहेत.

Advertisement
Tags :

.