महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शॉटगन नेमबाजांना परवानगी

06:29 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

पॅरिस ऑलिम्पिकसाठी सध्या येथे सुरु असलेल्या निवड चाचणी नेमबाजी स्पर्धेतून दर्जेदार कामगिरी करणाऱ्या नेमबाजांची निवड करण्याच्या प्रक्रियेला सध्या निर्बध घातले असले तरी यासंदर्भात न्यायालयीन लढाई सुरु आहे. दरम्यान या निवड चाचणी स्पर्धेत शॉटगन नेमबाजांना सहभागी होण्याची परवानगी राष्ट्रीय नेमबाजी फेडरेशनने दिली आहे.

Advertisement

भारताचा ट्रॅप नेमबाजपटू करण याची अखिल भारतीय रायफल संघटनेच्या नियमावलीनुसार निवड चाचणीसाठीची संधी केवळ 2 गुणांनी हुकली. तरीपण त्याला निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होण्यास मुभा देण्यात आली होती. दरम्यान इतर नेमबाजांनी करणसारखीच कामगिरी करुनही त्यांचा या निवड चाचणीसाठी विचार करण्यात आला नाही. या प्रकरणामुळे गेल्या नोव्हेंबरमध्ये अखिल भारतीय रायफल संघटनेतर्फे शॉटगन निवड चाचणी संदर्भात एक पत्र पाठविण्यात आले होते. आता हे वादग्रस्त प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता असून शॉटगन नेमबाजांना राष्ट्रीय निवड चाचणीत सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article