For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जल्लोष स्वागताचा : क्रिकेट शौकिनांचा जागर

06:10 AM Jul 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
जल्लोष स्वागताचा   क्रिकेट शौकिनांचा जागर
Advertisement

मुंबई : आयसीसी टी 20 वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचे नवी दिल्लीनंतर क्रिकेटची पंढरी मुंबईत महाजल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी खुल्या बसमधून विश्वचषक विजेत्या भारतीय संघाची नरीमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम अशी भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. टीम इंडियाच्या विजयोत्सवासाठी मुंबईत चाहत्यांचा महासागर लोटला होता. वानखेडे स्टेडियमवर विजयी परेड पोहोचल्यानंतर वर्ल्डकप विजेत्या टीम इंडियाला बीसीसीआयकडून 125 कोटी रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. याशिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे व यशस्वी जैस्वाल या महाराष्ट्राच्या खेळाडूंना एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.