For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोकाक विशेष बसला अल्प प्रतिसाद

11:11 AM Jul 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोकाक विशेष बसला अल्प प्रतिसाद
Advertisement

रविवारी एकच बस धावली : पर्यटकांची वर्षा पर्यटनाकडे पाठ

Advertisement

बेळगाव : परिवहनकडून वर्षा पर्यटनासाठी सोडण्यात आलेल्या विशेष बसला प्रवाशांचा प्रतिसाद थंडावला आहे. रविवारी केवळ एकच बस गोकाक धबधब्याकडे धावली. त्यामुळे परिवहनला विशेष बसमधून मिळणाऱ्या अधिक महसुलापासून दूर राहावे लागणार आहे. पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी परिवहनकडून गोकाक फॉल्ससाठी विशेष बस सुरू करण्यात आली आहे. दुसरा शनिवार, दर रविवार आणि शासकीय सुटीदिवशी ही बस धावत आहे. मात्र, या बससेवेला म्हणावा तसा प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याचे दिसत आहे. मागील आठवड्यापासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदी-नाले आणि धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाले आहेत.

गोकाक येथील धबधब्यालाही मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. दरम्यान, परिवहनने हिडकल डॅम, गोडचिनमलकी आणि गोकाक  फॉल्सचे दर्शन घडविण्यासाठी विशेष बस सेवा सुरू केली आहे. मात्र, या बससेवेला म्हणावा तसा पर्यटकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. दरवर्षी वर्षा पर्यटनासाठी सोडल्या जाणाऱ्या बससेवेला पर्यटकांचा उदंड प्रतिसाद मिळतो. गोकाकसाठी दर रविवारी दहाहून अधिक बसेस धावतात. मात्र, रविवारी केवळ एकच बस गोकाकला धावली. तसेच मागील रविवारीही गोकाककडे एकच बस गेली होती. त्यामुळे यंदा भर पावसाळ्यात वर्षापर्यटनासाठी धावणाऱ्या बससेवेला प्रतिसाद कमी असल्याचे दिसत आहे.

Advertisement

रविवारी केवळ एकच बस 

परिवहनकडून गोकाक फॉल्ससाठी विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे. महिन्यातील दुसरा शनिवार, दर रविवार आणि शासकीय सुटीदिवशी ही बस धावणार आहे. मात्र, रविवारी केवळ एकच बस गोकाक फॉल्सच्या दर्शनासाठी धावली आहे.

के. के. लमाणी (डीटीओ, बेळगाव)

Advertisement
Tags :

.