अमेरिकेत रेल्वेत गोळीबार, 4 जणांचा मृत्यू
06:25 AM Sep 04, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
शिकागो : अमेरिकेच्या शिकागो शहरात एका रेल्वेत झालेल्या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. गोळीबारानंतर त्वरित एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. गोळीबाराच्या घटनेत तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर चौथ्या इसमाला मेवुड येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते, जेथे उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अमेरिकेत यंदा सामूहिक गोळीबाराच्या किमान 378 घटना घडल्या आहेत.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article