महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ओमानच्या मशिदीत गोळीबार, 4 ठार

06:27 AM Jul 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जखमींमध्ये पाकिस्तानी नागरिक सामील

Advertisement

वृत्तसंस्था/ मस्कत

Advertisement

ओमानच्या एका मशिदीनजीक झालेल्या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी ओमानची राजधानी मस्कतमध्ये वादी अल-कबीर मशिदनजीक गोळीबार झाला. मशिदीत शियांशी संबंधित एक धार्मिक कार्यक्रम आयोजित होत असताना हा प्रकार घडला आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरातील सुरक्षा वाढविण्यासाठी आवश्यक सर्व पावले उचलण्यात आली आहेत. हल्ला कुणी केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही असे ओमानच्या पोलिसांनी सांगितले आहे. सोशल मीडियावर या हल्ल्याशी निगडित अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. गोळीबार सुरू होताच मशिदीत खळबळ उडाली, लोकांनी नजीकच्या अन्य मशिदीत आश्रय घेत  गोळीबारापासून स्वत:ला वाचविल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

या हल्ल्यात काही पाकिस्तानी नागरिक जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या राजदूताने रुग्णालयात जात त्यांची विचारपूस केली आहे. तर मस्कत येथील अमेरिकेच्या दूतावासाने स्वत:च्या नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. ओमानला मध्यपूर्वेतील मध्यस्थ म्हणून ओळखले जाते. तणावाच्या स्थितीत देशांदरम्यान तडजोड घडवून आणण्याचे काम ओमान करत असतो. ओमानमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहेत, तेथे सर्वसाधारणपणे गोळीबाराच्या घटना घडत नाहीत. ओमानच्या लोकसंख्येत मुस्लिमांचे प्रमाण 86 टक्के आहे. तसेच् ायातील 45 टक्के सुन्नी मुस्लीम तर 45 टक्के इबादी मुस्लीम आहेत. तर देशात 5 टक्के लोकसंख्या शिया मुस्लिमांची आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article