महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर अमेरिकेत पुन्हा गोळीबार

06:59 AM Jul 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बर्मिंगहॅमच्या नाईट क्लबमध्ये 7 जणांचा मृत्यू, 9 जखमी

Advertisement

वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम, वॉशिंग्टन

Advertisement

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अमेरिकेतील बर्मिंगहॅम शहर पुन्हा एकदा गोळ्यांच्या आवाजाने हादरले. बर्मिंगहॅम शहरातील एका नाईट क्लबमध्ये सोमवारी अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली. बर्मिंगहॅम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास 27व्या स्ट्रीट नॉर्थच्या 3400 ब्लॉकमध्ये असलेल्या एका नाईट क्लबमध्ये गोळीबार झाल्याची माहिती सुरक्षा सूत्रांकडून देण्यात आली. गोळीबाराचे कारण तपासण्यात पोलीस अधिकारी व्यग्र आहेत. सध्या तरी हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. फेडरल तपास यंत्रणा बर्मिंगहॅम पोलिसांना तपासात मदत करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच नाईट क्लबमध्ये पोहोचलेल्या पोलिसांना अनेक लोक जखमी अवस्थेत दिसून आले. सुरुवातीला सुरक्षा पथकाने क्लबमध्ये पडलेल्या दोन महिलांना मृत घोषित केले. याचदरम्यान बर्मिंगहॅम अग्निशमन आणि बचाव पथकाने अनेक जखमींना ऊग्णालयात नेले. उपचारादरम्यान आणखी पाच जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा 7 झाला आहे. तर किमान 9 जणांवर अजूनही ऊग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement
Next Article