अमेरिकेत पुन्हा गोळीबार, हल्लेखोरासह 3 जण ठार
07:00 AM Dec 08, 2023 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
लास व्हेगासमधील विद्यापीठात गोळीबार
Advertisement
वृत्तसंस्था /लास वेगास
Advertisement
अमेरिकेच्या लास व्हेगास शहरात गोळीबाराची घटना घडली आहे. नेवादा विद्यापीठ परिसरात झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत संशयित हल्लेखोराचाही मृत्यू झाला आहे. गोळीबारात एक जण जखमी झाला असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे लास व्हेगास पोलीस विभागाकडून सांगण्यात आले. पोलिसांकडून मृतांची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच संशयिताने आत्महत्या केली का तो चकमकीत मारला गेला हे देखील स्पष्ट करण्यात आलेले नाही. गोळीबार झाल्यावर लोकांनी स्वत:चा जीव वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. हल्लेखोराचा मृत्यू झाल्याने आता कुठलाच धोका नसल्याचे लास व्हेगास मेट्रोपॉलिटन पोलीस विभागाचे शेरिफ केविन मॅकमाहिल यांनी सांगितले आहे.
Advertisement
Next Article