महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘युरो टीम ऑफ दि टुर्नामेंट’मध्ये रोद्री, यामालसह स्पेनचे 6 खेळाडू

06:36 AM Jul 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ बर्लिन

Advertisement

स्पॅनिश मिडफिल्डर रोद्री आणि 17 वर्षीय लामिने यामाल यांना यूएफाच्या युरो 2024 स्पर्धेच्या संघात स्थान देण्यात आले असून या संघात त्यांच्या आणखी चार स्पॅनिश सहकाऱ्यांचा समावेश आहे. यूएफाच्या तांत्रिक निरीक्षकांनी 4-3-3 या रचनेचा अवलंब केलेला असून स्पर्धेदरम्यान हीच रचना सर्वाधिक लोकप्रिय राहिली.

Advertisement

इंग्लंडच्या कायल वॉकरला सलग दुसऱ्यांदा संघात स्थान मिळालेले असून या संघात निवड झालेला इंग्लिश संघातील तो एकमेव खेळाडू आहे. स्पेनने चौथ्यांदा युरो स्पर्धेचे जेतेपद मिळविताना अंतिम सामन्यात इंग्लंडवर 2-1 ने मात केली. या ‘टीम ऑफ दि टुर्नामेंट’मध्ये माईक मॅग्नन (फ्रान्स), मानुएल आकांजी (स्वित्झर्लंड), विल्यम सालिबा (फ्रान्स), मार्क कुकुरेला (स्पेन), डॅनियल ओल्मो (स्पेन), फाबियान रुईझ (स्पेन), जमाल मुसियाला (जर्मनी), निको विल्यम्स (स्पेन) या अन्य खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article