For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑलिम्पिकमध्ये सेनादलाच्या 13 अॅथलेट्स सहभाग

06:34 AM Jul 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑलिम्पिकमध्ये सेनादलाच्या 13 अॅथलेट्स सहभाग
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी भारतीय सेनादलाचे एकूण 13 क्रीडापटू विविधक प्रकारांत भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती सेनादलाने दिली.

सेनादलाच्या अॅडिशनल डायरेक्टोरेट जनरला ऑफ पब्लिक इन्फॉर्मेशन (एडीजीपीआय) विभागाने सोमवारी एक्सवर ही माहिती दिली. जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी या खेळाडूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला आणि त्यांना ऑलिम्पिक यशासाठी शुभेच्छा देताना त्यांच्या कठोर मेहनतीचे आणि समर्पित वृत्तीची प्रशंसा केली. त्यांनी याआधी ज्या अचीव्हमेंट्स केल्या आहेत, त्या आमच्यासाठी आणि देशासाठी अभिमानास्पद आहेत. यावेळी पॅरिसमध्ये सेनादलाचे 13 अॅथलेट्स सहभागी झाले आहेत. यामध्ये अप्रतिम कौशल्य असणारे आणि यापूर्वी जागतिक व्यासपीठावर मिळविलेल्या यशस्वी क्रीडापटूंचा समावेश आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.