कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सतीश कोळंबकर हत्याप्रकरणातील आरोपीवर गोळीबार

12:12 PM Apr 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पळून जाण्याच्या प्रयत्नात आरोपीचा पीएसआयसह पोलिसांवर हल्ला : तिघेजण जखमी

Advertisement

कारवार : येथील माजी नगरसेवक, ठेकेदार आणि राऊडी शिटर सतीश कोळंबकर यांच्या हत्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या प्रमुख संशयित आरोपी रितेश तांडेल याने केलेल्या हल्ल्यात पीएसआयसह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर स्वरक्षणासाठी पीएसआयनी केलेल्या गोळीबारात रितेश तांडेल जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळी सदाशिवगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांजाळीजवळ घडली आहे. आरोपी रितेश तांडेल याने केलेल्या हल्ल्यात पीएसआय कुमार कांबळे, हेडकॉन्स्टेबल हसन कुट्टी आणि कॉन्स्टेबल गिरीशय्या जखमी झाले आहेत. या थरारक घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, गेल्या रविवारी सकाळी येथील मुख्य रस्त्यावर मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी माजी नगरसेवक सतीश कोळंबकर यांची चाकूने भोसकून भीषण हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी  प्रमुख संशयित आरोपी रितेश तांडेल याला गोव्यातील एका समुद्र किनाऱ्यावरील हॉटेलमधून ताब्यात घेतले होते.

Advertisement

रितेशला ताब्यात घेऊन कारवारला आणण्यात आले. त्याला घटनास्थळी नेऊन माहिती घेण्यात आली. त्यानंतर घटनेचा पंचनामा करण्यासाठी सदाशिवगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांजाळीजवळ नेण्यात आले. त्यावेळी रितेशने पोलिसांच्या तावडीतून निसटून जाण्यासाठी पोलिसांवर हल्ला केला. रितेशने केलेला हल्ला परतवून लावण्यासाठी आणि स्वरक्षणासाठी पोलीस उपनिरीक्षक कुमार कांबळे यांनी गोळीबार केला. कांबळे यांच्या गोळीबारामुळे रितेशच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. रितेशने केलेल्या हल्ल्यात उपनिरीक्षक कुमार कांबळे, हेडकॉन्स्टेबल हसन कुट्टी आणि गिरीशय्या जखमी झाले आहेत. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संशयित आरोपी रितेशलाही उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. कारवार जिल्हा पोलीसप्रमुख एम. नारायण यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन जखमी पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रप़ृतीची चौकशी केली आणि त्यांना धीर दिला. यावेळी अन्य पोलीस वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान या घटनेने कारवार तालुक्यात खळबळ माजली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article