बुटासारखा आकारचे हॉटेल
1 रात्रीसाठीचे भाडे कळल्यावर बसेल धक्का
लोक एखाद्याठिकाणी वास्तव्य करावे लागल्यास हॉटेलचा पर्याय निवडतात. याकरता ते सुंदर अन् सुरक्षित हॉटेल पसंत करतात. असेच एक हॉटेल असून त्याचा आकार बुटासारखा आहे. तसेच या हॉटेलचे एका दिवसाचे भाडे सामान्य व्यक्ती खर्च उचलू शकणार नाही. हॅन्स शू हाउस एक रेंटल होम असून ते पेन्सिल्वेनियाच्या यॉर्कमध्ये आहे. हे न्यूयॉर्क शहरापासून केवळ तीन तासांच्या ड्राइव्हवर आहे. याला 1948 मध्ये ‘द शो विजर्ड’ नावाने प्रसिद्ध अमेरिकन उद्योजक महलोन हाइन्स यांनी निर्माण केले होते. हाइन्स यांनी प्रथम याला घराच्या स्वरुपात निर्माण केले होते.
या बूटाच्या आकारातील घराचा वापर शू स्टोर्सच्या जाहिरातींसाठी करण्याचा त्याचा विचार होता. परंतु याला एका पर्यटनस्थळाचे स्वरुप देण्याची योजना त्यांनी आखली. या इमारतीला पाहून दुकानांपर्यंत देखील लोक पोहोचतील, अशी अपेक्षा होती. सद्यकाळात पर्यटक दूरवरून येथे पोहोचतात. या 48 फूट लांब ऐतिहासिक घरात राहण्यासाठी ते बुकिंग करतात. जर या घरासमोरून ड्राइव्ह करत जात असल्यास थांबत फोटो अवश्य काढून घेतात. वेलेन आणि नाओमी ब्राउन यांनी या अनोख्या घराला 2022 मध्ये खरेदी करत यात किरकोळ नुतनीकरण केले. दांपत्याकडून हे घर खरेदी केले जाण्यापूवीं याला लँडमार्क घराचा वापर म्युझियम आणि एक आइस्क्रीम शॉपच्या स्वरुपात केला जात होता.
किती आहे हॉटेलचे भाडे
आइस्क्रीम शॉप म्हणून याचा वापर करताना फारसा फायदा झाला नव्हता. याचमुळे बिझनेस मॉडेल बदलण्याचा विचार केला गेला. या घराला एअरबीएनबीवर लिस्ट करण्यात आल्याचे नाओमीने सांगितले. शू हाउसला पर्यटकांची मोठी पसंती मिळाली आहे. हा एक अत्यंत मजेशीर आणि अनोखा अनुभव असतो. घर 1500 चौरस फुटांचे असून यात तीन बेडरुम, 3.5 बाथरुम, लिव्हिंग स्पेस आणि किचन एरिया सामील आहे. या हॉटेलमध्ये वास्तव्यासाठी 42 हजारांपासून 55 हजार रुपयांपर्यंत खर्च करावे लागतात, असे दांपत्याने सांगितले आहे.