क्रिकेट जगतासाठी धक्कादायक बातमी, टीम इंडियाच्या माजी खेळाडूने केली आत्महत्या
भारताचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड जॉन्सन बेंगळुरमध्ये आढळला मृतावस्थेत
बेंगळुर : माजी भारतीय क्रिकेटपटू डेव्हिड जॉन्सन गुरुवारी त्याच्या अपार्टमेंटबाहेर मृतावस्थेत आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. असे समजले जाते की 52 वर्षीय डेव्हिड ज्युड जॉन्सन हे कोठनूर येथील कनका श्री लेआउटमधील त्यांच्या अपार्टमेंटमधून पडल्याने आत्महत्येचा संशय निर्माण झाला आहे, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, पुढील तपास सुरू आहे. अनेक दिवसांपासून क्रिकेटरची तब्येत ठीक नव्हती, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. माजी वेगवान गोलंदाज जॉन्सनच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. या क्रिकेटपटूने 1996 मध्ये भारतासाठी दोन कसोटी सामने खेळले होते.
डेव्हिड जॉन्सनची कारकीर्द
डेव्हिड जॉन्सनने 2 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. या खेळाडूने भारताकडून कसोटी सामन्यात ४७.६७ च्या सरासरीने ३ बळी घेतले. याशिवाय डेव्हिड जॉन्सनने फलंदाज म्हणून ४० च्या सरासरीने ८२ धावा केल्या.
अनिल कुंबळेने डेव्हिड जॉन्सनसाठी काय लिहिले?
भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये अनिल कुंबळेने लिहिले आहे- माझा क्रिकेट सहकारी डेव्हिड जॉन्सन यांच्या निधनाच्या वृत्ताने मी दु:खी झालो आहे, त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करतो. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स डेव्हिड जॉन्सनवर सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.