अल्ट्रा झकास ओरिजिनलची पहिली सीरिज ‘IPC’ २५ ऑक्टोबर पासून ओटीटी वर
दर महिन्याला प्रदर्शित होणार एक नवी वेब सीरिज : महाराष्ट्राला हादरून टाकणाऱ्या अनेक सत्य घटनांनी प्रेरित अल्ट्रा झकासची पहिली ओरिजिनल सीरिज 'IPC'
मुंबई : अल्ट्रा झकास ओटीटीची पहिली मराठी ओरिजिनल वेब सिरीज ‘IPC’ २५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘IPC’ हि वेब सिरीज अनेक सत्य घटनांपासून प्रेरित क्राइम थ्रिलर सिरीज असणार आहे. त्याचबरोबर अल्ट्रा झकास ओटीटीवर दर महिन्याला एक नवी कोरी वेब सीरिज देखील प्रदर्शित करण्यात येणार आहे. या वेब सिरीजमध्ये किशोर कदम, देविका दफ्तरदार, राजेंद्र शिसातकर,सुरेश विश्वकर्मा व अभिनय सावंत ह्यांच्या सारख्या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी अनुभवायला मिळेल. कोकणातील छोट्या गावात शिमगोत्सवाच्या दिवशी एका २० वर्षीय तरुणीवर अमानुष अत्याचार होतो आणि सुरु होते एक रहस्यमय थरारक घटनांची शृंखला जी वास्तवात घेऊन येते कल्पनेच्या पलीकडले सत्य, जे उलगडणार २५ ऑक्टोबरला.
अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते, राजेश चव्हाण या सिरीजचे दिग्दर्शक आहेत,आणि अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ, श्री. सुशीलकुमार अग्रवाल यांनी या सिरीजची निर्मिती केली आहे. अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ, श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले की, “अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर 'IPC' हि पहिली वेब सिरीज प्रदर्शित होणार असून हि तुम्हाला जगभरात कुठेही पाहता येईल.या प्लॅटफॉर्मवर दर महिन्याला एक नवी मराठी वेबसीरिज प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना वेगळ्या प्रकारच्या कथा अनुभवायला मिळतील.”
'IPC' मराठी या वेब सिरीजचे दिग्दर्शक राजेश चव्हाण म्हणाले, “मी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीचे आभार मानतो कि त्यांनी त्यांची महत्त्वाची अशी पहिली वेब सिरीज दिग्दर्शन करण्याची संधी मला दिली. हि वेब सिरीज दिग्दर्शित करण्यामागचा अनुभव फारच वेगळा आणि एक जवाबदारीपूर्ण होता. 'IPC' या गंभीर विषयावर वेब सिरीज तयार करण्यामागे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड कंपनीचा खूप मोठा पाठींबा आणि विश्वास होता.”
अल्ट्रा झकास हा भारतातील पहिला असा मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्हाला अनलिमिटेड मराठी कंटेंट मिळेल. सोबतच दर महिन्याला नवीन ओरिजिनल वेब सिरीज पाहता येईल. अल्ट्रा झकास प्लॅटफॉर्म Android, iOS, टॅब, वेब, Android TV, Fire TV, Jio Store आणि Cloud TV वर सहज उपलब्ध आहे. शिवाय तुम्हाला पूर्ण वर्षभराचे मनोरंजन अवघ्या १९९/- रुपयांत पाहता येणार हे या ॲपचे वैशिष्ट आहे. ३०००+ तासांचा अनलिमिटेड कंटेंट, मराठी चित्रपट, विनोदी नाटकं आणि बरंच काही तुम्हाला या ठिकाणी मिळेल आणि तासंतास मनोरंजनाचा आनंद मनसोक्त लुटता येईल.