महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अल्पवयीन मुलींना दारू पाजत सामूहिक अत्याचार

12:46 PM Sep 21, 2024 IST | Abhijeet Khandekar
rape
Advertisement

बारामतीत मोठी खळबळ, हडपसर परिसरात अत्याचार, तिघांना अटक; एकजण फरार

बारामती प्रतिनिधी

बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींना दारू पाजत सामुहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील हडपसर परिसरात अत्याचार केल्याचे समोर आले असून सदर प्रकरणी तिघांना अटक केली असून एक जण फरार आहे. या घटनेने बारामतीत मोठी खळबळ उडाली आहे.

Advertisement

ज्ञानेश्वर भरत आटोळे (वय 27, रा. सावळ), अनिकेत प्रमोद बेंगारे (वय 20, रा. बयाजीनगर, रुई, बारामती) व यश उर्फ सोन्या शिवाजी आटोळे (वय 21, रा. सावळ, ता. बारामती) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना बारामती न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Advertisement

नेमकी घटना कशी घडली..!
दि. 14 सप्टेंबर रोजी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या वेगवेगळ्या फिर्यादी बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या दोघी मुली शहरातील वेगवेगळ्या शाळांमध्ये नववीमध्ये शिक्षण घेत आहेत. परंतु त्या एकमेकींच्या मैत्रिणी आहेत. त्या दि. 14 रोजी घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेल्या. बसने त्या पुण्यात पोहोचल्या. जाताना त्यांनी ज्ञानेश्वर आटोळे याच्याशी संपर्क साधला. त्याने हडपसर परिसरातील दोघा मित्रांना या मुली येत असल्याचे सांगितले. मुलींपाठोपाठ तो ही बारामतीतून हडपसरला गेला. तेथे एका मित्राच्या खोलीवर या मुलींना नेण्यात आले. रात्री त्यांना दारु पाजून या तिघांसह अन्य एका फरार आरोपीने त्यांचे आळीपाळीने लैंगिक शोषण केले. दरम्यान, यातील एका मुलीने हडपसरहून तिच्या आईला फोन केला. आईने बारामती तालुका पोलिसांना याची माहिती दिली. त्यानुसार तालुका पोलिसांनी हडपसर पोलिसांशी संपर्क साधला. बारामतीतून महिला पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह एक पथक हडपसरकडे रवाना झाले. दि. 16 रोजी या मुलींना पोलिसांनी बारामतीत आणले. येथे त्यांचे महिला पोलिसांकडून समुपदेशन केले जात असताना या दोघींना दारु पाजून चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली.

दरम्यान, आरोपी मोबाईल टावर्सच्या इनव्हर्टला डिझेल भरण्याचे काम करतात. तिघांशी या मुलींची आधीपासूनच चांगली ओळख होती. ओळखीतुनच हा गैरफायदा या मुलांनी घेतला. दोन्ही मुलींचे पितृछत्र हरपले असून दोघींच्या आई मोलमजुरी करून त्यांचे शिक्षण करतात. आरोपी ज्ञानेश्वर हा विवाहित आहे. दरम्यान, याबाबत बारामतीत उलट-सुलट चर्चा चालू असून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे लोकांच्यातून समजते.

घटनेत दोन वेगवेगळ्या फिर्यादी दाखल...
त्यानुसार सुरुवातीला ज्ञानेश्वर याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून अन्य आरोपींची नावे निष्पन्न झाली. त्यानुसार बेंगारे व सोन्या आटोळे या दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील चौथा आरोपी अद्याप फरार आहे. या घटनेत दोन वेगवेगळ्या फिर्यादी दाखल झाल्या आहेत. एका घटनेत बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमासह अॅट्रॉसिटी, लैंगिक शोषण तर दुसऱ्या घटनेत लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी दिली.

Advertisement
Tags :
Baramatigang rape of two minor girls
Next Article