For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धक्कादायक! २४ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

03:13 PM Jan 21, 2025 IST | Pooja Marathe
धक्कादायक  २४ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा
Advertisement

विट्यातील शासकीय निवासी शाळेतील २४ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा
सांगली
सांगली जिल्ह्यातील विटा साळशिंगे रस्त्यावरील आयटीआय कॉलेज शेजारी असणाऱ्या शासकीय निवासी शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. काल दिवसभरात विद्यार्थ्यांनी घेतलेल्या आहारातून ही विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने शाळा प्रशासनासह परिसर अक्षरशः हादरून गेला आहे. विट्यातील शासकीय निवासी शाळेत एकूण 93 विद्यार्थी असून त्यापैकी तब्बल 23 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघड झाला आहे.

Advertisement

याबाबत शाळा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, शासकीय निवासी शाळेचे रूटीन सुरू असताना काल विद्यार्थांना नेहमीप्रमाणे मांसाहारी जेवण देण्यात आले. त्यानुसार दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना मटण तर सायंकाळी 5 वाजता दूध आणि कलिंगडचा आहार देण्यात आला. तर रात्री 7 वाजता नेहमीप्रमाणे चपाती, भाजी, आमटीचे जेवण देण्यात आले. यानंतर रात्रीच्या वेळी काही विद्यार्थ्यांना जुलाब आणि उलटीचा त्रास सूरू झाला. यानंतर सकाळ होईपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना जुलाब आणि उलटीसह पोटदुखीची लक्षणे जाणवू लागली. यानंतर विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे लक्षात येताच शाळा प्रशासनाने सदर विद्यार्थ्यांना तातडीने विट्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानुसार विट्यातील ग्रामीण रुग्णालयात तब्बल 24 विद्यार्थ्यांना जुलाब, पोट दुखी आणि उलटीसारखी लक्षणे आढळून आली आहेत.

या संपूर्ण प्रकाराची माहिती मिळताच आमदार सुहास भैय्या बाबर यांनी तातडीने विट्यातील ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली आणि विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची पाहणी केली. यावेळी आमदार सुहास भैय्या बाबर यांनी शासकीय निवासी शाळेत डॉक्टरांची टीम पाठवून सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना विट्यात बोलवून विद्यार्थ्याकडे विषेश लक्ष देण्यास सांगितले आहे. त्यानुसार विट्यातील बालरोग तज्ञांसह ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची संपूर्ण टीम या विद्यार्थ्यांना उपचार करण्यासाठी ताकतीने सज्ज झाली आहे. विट्यातील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी या विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी यंत्रणा सज्ज केली असून 23 विद्यार्थ्यांपैकी 21 विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर केली आहे. तर उरलेल्या 2 अशक्त मुलांवर डॉक्टरांकडून विशेष लक्ष ठेवून उपचार सुरू करण्यात आले आहेत. विट्यातील ग्रामीण रुग्णालयात सध्या विद्यार्थ्यांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची मोठी टीम तैनात करण्यात आली असून आमदार सुहास बाबर यांच्या सूचनेनुसार निवासी शाळेत देखील डॉक्टरांचे एक पथक पाठवून संपूर्ण विद्यार्थ्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. तर अत्यावश्यक सेवेसाठी विट्यातील ग्रामीण रुग्णालयासह शासकीय निवास शाळेसमोर ॲम्बुलन्सची देखील तातडीची सोय करण्यात आली आहे. एकूणच, विटा शहरातील शासकीय निवासी शाळेत विषबाधेचा खळबळजनक प्रकार समोर आला असून डॉक्टरांच्या मदतीने संपूर्ण विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर हा संपूर्ण प्रकार नेमका कशामुळे घडला याचा देखील तपास सुरू करण्यात आला आहे. यासंपूर्ण प्रकाराची माहिती विटा पोलिसांना देण्यात आली असून विटा पोलिसांनी देखील ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन या संपूर्ण घटनेचा पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे.
या प्रसंगी शासकिय रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी डॉ. आलोक नरदे यांनी सांगितले की, सकाळी ११ च्या दरम्यान शासकिय निवासी शाळेतील मुलं जुलाब होत आहे, अशी तक्रार घेऊन आली. दरम्यान डॉक्टरना शंका आल्याने या विद्यार्थ्यांना रुग्णालयात अॅडमीट करून घेतले. अशा तक्रारीची आत्तापर्यंत २० ते २२ विद्यार्थी दाखल झाले आहेत. या सर्व मुलांची एकच शाळा आहे. या सर्व मुलांना रात्री साडे तीन पासून पोटात दुखत आहे, आणि उल्ट्या आणि जुलाबाचा त्रास होत आहे. यापैकी दोन मुले जास्त प्रमाणात बाधित असल्यामुळे त्यांना उपचार सुरु केले आहेत. याचबरोबर इतर सर्व मुलांना यावर उपचार सुरु केले आहेत. या मुलांनी काल रात्री (दि. २०) रोजी मासांहारी अन्न ग्रहण केले होते. त्यामुळे प्रकृती बिघडल्याची शक्यता असल्याचे डॉ.आलोक नरदे. यांनी सांगितले.
यावेळी डॉ. आलोक नरदे म्हणाले, ज्या शाळेमधील मुलांना बाधा झाली आहे. तिथे डॉक्टर पाठविले आहेत. तसेच त्या शाळेत एक अॅब्युलन्सही तैनात ठेवली आहे. या शाळेतील इतर मुलांना काही त्रास असल्याचे लगेच उपचार सुरु होतील.

Advertisement

Advertisement
Tags :

.