तिलारी नदीपात्रात 'शॉक' लावून मासेमारी
▪️ उरलेले मासे कुजतात, पाणी दूषित, या पाण्यावर आहेत नळयोजना
▪️ प्रशासनाने कडक पावले उचलावीत ग्रामस्थांची मागणी
दोडामार्ग - प्रतिनिधी
तिलारी नदीपात्राचे पाणी कमी झाल्यावर अवैध मासेमारीला ऊत येत आहे. तिलारी नदीपात्रात 'शॉक' लावून मासेमारी सुरु आहे. जे मासे मृत होतात त्यांचे प्रमाण अधिक असल्याने उर्वरित मासे नदीपात्रात तसेच कुजतात. परिणामी, परिसरात दुर्गंधी येतेच शिवाय या नदीपात्रालगत नळयोजना विहिरी असून दूषित पाण्याचा धोका उद्भवणार आहे. त्यासाठी तातडीने संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.याबाबत ग्रामस्थांकडून मिळालेली माहिती अशी की, तिलारी नदीपात्रात गळ टाकून मासेमारी नेहमी सुरु असते. त्याला कोणाचाही विरोध नाही. मात्र ,अलीकडे बॅटरीचा आधार घेत परभागातून खास मासेमारीसाठी 'शॉक' पद्धत वापरली जात आहे. यामध्ये मासे पुष्कळ मिळतात. मात्र छोटे मासे मोठया संख्येने मृत्यू पावतात. जे खाण्यायोग्य नसतात त्यामुळे ते तसेच टाकले जातात. परिणामी ते कुजतात. हे आत्ताच रोखलं गेल नाही तर भविष्यात पाणी प्रदूषण वाढणार आहे.
फोटो - संग्रहीत