महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘डॉन 3’मध्ये दिसणार शोभिता

07:00 AM Aug 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शोभिता धुलिपाला सध्या नागा चैतन्यसोबतच्या साखरपुड्यावरून चर्चेत आहे. हे जोडपे लवकरच विवाहबद्ध होणार आहे.  आता अभिनेत्री शोभिता ही रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या ‘डॉन 3’ या चित्रपटात दिसून येणार असल्याचे समजते. अभिनेत्री सध्या फरहान अख्तरसोबत चर्चा करत आहे. दोघांची चर्चा यशस्वी ठरली तर शोभिता ही या बिगबजेट चित्रपटात दिसून येणार आहे. फरहानने शोभिताला एका आयटम साँगसाठी विचारणा केली असल्याचे समजते. डॉन 3 संबंधी दीर्घकाळापासून बोलणी सुरू आहे. फरहानने मागील वर्षी याचा टीझर सादर करत सर्वांना चकित केले होते. परंतु नव्या चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असल्याने शाहरुख खानचे चाहते नाराज झाले आहेत. 2006 साली प्रदर्शित डॉन चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. डॉन 3 या चित्रपटात रणवीर सिंहसोबत कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटात शोभिताची वर्णी लागली तर प्रेक्षकांच्या मनोरंजनात मोठी भर पडणार आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article