महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट
Advertisement

shivsenadasaramelava-शिवसेनेचा दसरा मेळावा अडचणीत? परवानगीच्या पत्राला BMC कडून उत्तर नाही

12:32 PM Aug 27, 2022 IST | Abhijeet Khandekar

shivsenadasaramelava- गेल्या अनेक वर्षाची परंपरा असलेला शिवसेनेचा दसरा मेळावा (dasara melava) यंदा अडचणीत आला असून त्यारून शिंदे सरकार आणि ठाकरे पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दसऱ्यात शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्क इथे पार पडत असतो. मात्र त्यासाठी परवानगी साठी पाठवलेल्या पत्रावर अद्याप कोणताच निर्णय घेतला नसल्याने शिवसेनेचा दसरा मेळावा हायजॅक करण्याचे षडयंत्र सुरु आहे कि काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी जे नियमात असे ते करू, असे विधान केल्याने याची धार आणखी वाढली आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेकडून (BMC) मेळाव्याला परवानगी मिळावी, यासाठी शिवसेनेनं अर्ज दाखल केला असताना, महापालिकेनं मात्र हात आखडता घेतल्याची माहिती मिळत आहे. अशातच आता शिवसनेसाठी महत्त्वाचा असलेला दसरा मेळावाच हिसकावण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असल्याची माहिती मिळत आहे.

Advertisement

दसरा मेळाव्याला परवानगी मिळवण्यासाठी शिवसेनेकडून मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज करण्यात आला आहे. पण अद्याप शिवसेनेला कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती मिळत आहे. शिंदे गटाकडून वारंवार शिवसेना पक्ष, पक्षाचं चिन्ह यांवर दावा केला जात आहे. शिवसेना नेमकी कोणाची? हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशातच आता शिंदे गटाकडून शिवसेनेचा दसरा मेळावाही हायजॅक होणार का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्याचं पाहायला मिळत आहे. तर आमदार सदा सरवणकर यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून निर्णय घेतला जाईल, असे सांगितल्यानंतर शिवसेनेचा दसरा मेळावा शिंदे गटांकडून हायजॅक करण्याचे षढयंत्र सुरु आहे कि काय? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisement
Tags :
Devendra Fadnavisshivsenauddhav thackery
Advertisement
Next Article