For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवराज स्कूलचे क्रीडा स्पर्धेत यश

10:24 AM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
शिवराज स्कूलचे क्रीडा स्पर्धेत यश
Advertisement

वार्ताहर/उचगाव

Advertisement

मोराराजी देसाई हायस्कूल मंडोळी येथे घेण्यात आलेल्या बेळगुंदी विभागीय क्रीडा स्पर्धेत दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित शिवराजहायस्कूल बेनकनहळ्ळी येथील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या क्रीडास्पर्धेत यश मिळवून तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यांची निवड करण्यात आली आहे.

1) बुद्धीबळ स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्रतीक्षा अमोल पाटील, द्वितीय महेश बाळू पाटील, 2) कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक स्वप्निल कृष्णा सुतार, द्वितीय क्रमांक इच्छा ईश्वर बांडगे, 3) योगा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्रथमेश भरमा येळ्ळूरकर. 4) कराटे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक हर्षद मारुती पाटील, 5) मल्लखांब आणि रोपमल्लखांब मुलांमध्ये  प्रथम क्रमांक प्रथमेश भरमा येळ्ळूरकर,संकेत नारायण मंडलिक, मंथन प्रवीण मंडलिक, सर्वेश ईश्वर पाटील, 6) मल्लखांब मुलीमध्ये प्रथम क्रमांक रूपाली प्रकाश पाटील, करुणा कृष्णा देसुरकर, भक्ती कल्लाप्पा देसुरकर इत्यादी. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Advertisement

Advertisement
Tags :

.