महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भाजप अध्यक्षांसोबत शिवराज चौहानांची चर्चा

06:01 AM Dec 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री : राष्ट्रीय स्तरावर जबाबदारीचे मिळाले संकेत :

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंगळवारी भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांची भेट घेतली आहे. शिवराज यांनी एक तासाहून अधिक वेळ चर्चा झाल्यावर एक छायाचित्र शेअर केले आहे. या छायाचित्राच्या कॅप्शनदाखल शिवराज यांनी ‘सेवा हाच संकल्प आहे’ असे म्हटले आहे. शिवराज यांनी या भेटीनंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणे टाळले असले तरीही नव्या जबाबदारीसंबंधी संकेत मात्र दिले आहे.

भाजप अध्यक्ष नड्डासोबत राष्ट्र कल्याण, लोककल्याण आणि जनसेवेविषयी चर्चा झाली. सेवा हाच संकल्प आहे या ध्येयासाठी भाजपचे सर्व कार्यकर्ते समर्पित आहेत असे शिवराज यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केले आहे.

पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून जी भूमिका निश्चित केली जाईल ती मी पार पाडणार आहे. पक्षाने ठरविल्यास मी राज्यात कार्यरत राहिन किंवा केंद्रात भूमिका बजावणार आहे. जेव्हा तुम्ही मोठ्या ध्येयासाठी काम करत असता तेव्हा पक्षच तुमची जबाबदारी ठरवत असतो असे शिवराज यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

सध्या मला भारत संकल्प यात्रेत सामील व्हायचे असून दक्षिणेतील राज्यांमध्ये जाण्याची सूचना केली जाऊ शकते. परंतु दक्षिण भारताची जबाबदारी भाजपकडून मला सोपविण्यात आलेली नाही. भाजप विधिमंडळ बैठकीत भाग घेण्यासाठी मी भोपाळमध्ये परतणार आहे. परंतु पुढील काळात दिल्लीतच भेटणार आहे. मी पुन्हा दिल्लीत येईन आणि वारंवार भेटत राहिन असे म्हणत शिवराज यांनी राष्ट्रीय स्तरावर जबाबदारी मिळण्याचे संकेत दिले आहेत.

नव्या जबाबदारीच्या प्रतीक्षेत

दीड दशकापेक्षा अधिक काळापर्यंत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले शिवराज सिंह चौहान यांच्याजागी भाजपने मोहन यादव यांच्याकडे राज्याची धुरा सोपविली आहे. मध्यप्रदेशात नेत्रदीपक यश मिळविल्यावरही मुख्यमंत्रिपदावरून हटविण्यात आलेल्या शिवराज यांच्या राजकीय भवितव्यासंबंधी कयास वर्तविले जात आहेत. शिवराज यांना केंद्रात मंत्रिपद मिळू शकते अशीही चर्चा आहे. तसेच पक्ष संघटनेत मोठे पद दिले जाण्याचीही शक्यता आहे. परंतु शिवराज चौहान किंवा पक्षाकडून अधिकृतपणे कुठलीच माहिती देण्यात आलेली नाही.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article