Satara Politics : शिवेंद्रसिंहराजे राजधानीत; यादी गुलदस्त्यात !
साताऱ्यात इच्छुकांची उमेदवारीसाठी स्पर्धा
सातारा : साताऱ्यात भाजपा प्रथमच खासदार छ. उदयनराजे आणि मंत्री . छ. शिवेंद्रराजे यांच्या माध्यमातून कमळ या चिन्हावर निवडणूक लढवू पहात आहे. त्याकरता इच्छुकांच्या घेतलेल्या मुलाखतीची यादी घेवून गेलेले मंत्री शिवेंद्रराजे हे राजधानीत दाखल झाले. मुंबईवरुन आल्यानंतर ते यादी जाहीर करतील असे मानले जात होते. परंतु त्यांनी नेहमीप्रमाणे जनता दरबार घेतला. लोकांच्या गाठीभेटी सुरु केल्या.
परंतु यादी जाहीर केली नाही. त्यामुळे भाजपाचे कार्यकर्ते बेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत असून बंडखोरीच्या तयारीत असलेल्यांनी थेट विरोधी असलेल्यामहाविकास आघाडीशी सूत जुळवणे सुरु केले आहे. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीकरता भाजपाने रणशिंग फुंकले आहे. त्यासाठी महायुती म्हणून नव्हे तर भाजपा म्हणून खासदार . छ. उदयनराजे आणि बांधकाममंत्री . छ. शिवेंद्रराजे यांनी आपल्या आघाड्या बाजूला ठेवून भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणुका लढवण्याकरता इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. तयार केलेल्या याद्या घेवून मंत्री शिवेंद्रराजे हे मुंबईच्या बैठकीला हजर होते. तेथून परत साताऱ्यात मंत्री शिवेंद्रराजे आले. परंतु त्यांच्यासोबत निवडणूक कोण लढवणार याची यादी आणली गेली नाही. तसेच त्यांनी कोणाला उमेदवारी दिली गेली आहे हेही जाहीर केलेले नाही.
त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ चार दिवस उरले असून चार दिवसांमध्ये काहीही होवू शकते. अजूनही कोणताच असा फॉर्म्युला ठरला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, दुसऱ्या बाजूला इतर पश्नांकडून सावध पवित्रा घेत पावले टाकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे दि. १५ नंतरच नेमक्या घडामोडी पहायला मिळणार आहेत. उमेदवारीसाठी इच्छुकांची खटपट आपले नेते हाच आपला पश्न, आपल्या नेत्यांशी आपली श्रद्धा आपली निष्ठा हीच आपली पत्नाची विचारधारा असे आजपर्यंत सर्वच नेत्यांच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांच्याबाबतीत असून त्यामध्ये सध्या भाजपाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा सुरु आहे. त्यात नेता कोणावर कृपा करेल हे सांगता येत नाही. इच्छुकांची उमेदवारीसाठी खटपट सुरु आहे.
काही इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
साताऱ्यात भाजपाकडून तिकीट नाही मिळाले तर अपश्न निवडणूक त्या प्रभागातून लढवण्यासाठी सज्ज आहेत. एकूणच बंडखोरी करण्याच्या तयारीत अनेक इच्छुक असून नेत्यांचा आदेश मिळो अगर न मिळो अर्ज भरण्याची मात्र तयारी सुरु केली आहे. नेट कॅफेत, महा ई सेवा केंद्रातही गर्दी पहायला मिळत आहे.
दोन्ही भावांची भेट नाहीच
मुंबईबरुन लखोटा येणार आहे. परंतु त्यापूर्वी मुंबईहून राजधानीत दाखल झालेले मंत्री शिवेंद्रराजे आणि खासदार उदयनराजे यांची बैठक बा एकत्र चर्चा गुरुवारी दिवसभर कुठेही झाली नव्हती. मंत्री शिवेंद्रराजे यांनी मात्र सकाळी जनता दरबार घेतला. तेथून ते कार्यकर्त्याच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला व इतर कार्यक्रमांना भेट देण्यासाठी रवाना झाले.