पंचायत समितीवर शिवेंद्रराजेंची मजबूत पकड
सातारा
सातारा पंचायत समितीची आताची इमारत ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जागेत असून ही इमारत त्यामुळे नवीन बांधता येत नव्हती. आता मात्र, त्यातील अडथळे दूर झाले असून त्या इमारतीच्या नवीन बांधकामास प्रशासकीय मंजुरी सोमवारी मिळाली आहे. तब्बल 13 अटी ठेवून 5459.50 चौरस मीटर क्षेत्राच्या बांधकामासाठी 28 कोटी 6 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प dरयत्नातून नवीन दिखाखदार इमारत होणार आहे. विद्यमान गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी नवीन इमारतीचा प्रश्न निकाली निघाला आहे. शासनाने सातारा पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या कामास प्रशासकीय मंजुरी दिली आहे. लवकरच सातारा पंचायत समितीची तीन मजली प्रशस्त अशी इमारत उभी केली जाणार आहे.
सातारा पंचायत समितीच्या आताच्या इमारतीला सुमारे 50 वर्षाहून अधिक काळ होवून गेलेला आहे. 1960 सालची इमारत आहे. त्या इमारतीचा छत गळतो आहे. तळमजल्यात काही केबीनमध्ये पाणी पावसाचे येते. धोकादायक इमारत झाल्याने आजपर्यंत अनेकदा पंचायत समितीत ठराव होवून इमारत नवीन करण्यासाठी हालचाली झाल्या होत्या. परंतु इमारत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जागेत असल्याने सर्व प्रयत्न अपयशी ठरत होते. काही सदस्य, सभापतींनी तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून जागेचा प्रश्न मांडला होता. परंतु त्यांच्याही प्रयत्नांना यश आले नव्हते. प्रशासक म्हणून सतीश बुद्धे हे आले. त्यांनी हे प्रकरण तडीस नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तत्कालिन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन याच्ंयावतीने पाठपुरावा केला. सर्व कागदपत्रे सादर करुन जागेचा प्रश्न निकाली लावला. नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी निधी आणण्याच्या कामासाठीही प्रशासकीय हालचाली सुरु झाल्या अन् दि. 9 जुन रोजी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. नगरभूमापन क्रमांक 526 वर सातारा पंचयत समितीची इमारत 5489.50 चौरस मीटर क्षेत्रफळात साकारली जाणार आहे. त्याकरता उच्चस्तरीय समितीने अंदाजित 28 कोटी 6 लाख रुपयांचा निधीस तत्वत: मंजुरी दिली गेली आहे. त्यामुळे लवकरच ही इमारत सातारा तालुक्यातील जनतेला पहायला मिळणार आहे.
- अशी असेल सातारा पंचायत समितीची नवीन इमारत
सातारा पंचायत समितीची नवीन होणारी इमारत ही तीन मजली असणार आहे. बेसमेंट 890 स्केअर मीटरचे, ग्राऊंड फ्लोअर 1317.65 स्केअर मीटर, फस्ट फ्लोअर 1198.20 स्केअर मीटर, सेकंड फ्लोअर 1047.65 स्केअर मीटर, थर्ड फ्लोअर 1036 स्केअर मीटर आहे. लिफ्ट, सीसीटीव्ही अशी असणार आहे.
- 13 अटी ठेवून दिली मंजुरी
इमारतीच्या नवीन बांधकामास मंजुरी देताना 13 अटी ठेवण्यात आलेल्या असून त्यामध्ये प्रस्तुत प्रशासकीय इमारतीत दिव्यांगाना सोयी सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने रॅम्प, रेलींग व तत्सम सुविधा निर्माण करणे बंधनकारक राहिल, हे काम हाती घेतल्यापासून तीन वर्षात पूर्ण होईल असे नियोजन करुन त्या इमारतीच्या बांधकामाचा त्रैमासिक प्रगती अहवाल शासनाकडे पाठवण्याची दक्षता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घ्यावी, अशा 13 अटी ठेवल्या गेल्या आहेत.