कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिवम दुबेकडून अॅथलिट्सना आर्थिक मदत

06:44 AM Apr 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / चेन्नई

Advertisement

भारताचा अष्टपैलु तसेच सध्या चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून आयपीएल स्पर्धेत खेळणारा शिवम दुबे याने तामिळनाडूतील होतकरु नवोदित युवा 10 अॅथलिट्सना प्रत्येकी 70 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. तामिळनाडू क्रडा पत्रकार संघटनेच्या पुरस्कार आणि शिष्यवृत्ती वितरण समारंभावेळी दुबे उपस्थित होता.

Advertisement

2024 च्या आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविणाऱ्या भारतीय संघामध्ये शिवम दुबेचा समावेश होता. तामिळनाडूतील पी.बी. अभिनंदन (टेबल टेनिस) एम. वेलासामी पॅराअॅथलेटिक्स, शमिना रियाज-स्क्वॅश, आर. के. जयन व एस. नंदना-क्रिकेट, पी. कमली-सर्फिंग, अभिनया, जितीन अर्जुनान-अॅथलिट्स, तेक्षानत (बुद्धिबळ) या खेळाडूंना शिवम दुबेतर्फे प्रत्येकी 70 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article