शिवाजीराव पाटील यांच्या जाहीरनाम्यात सीमा प्रश्नाचा उल्लेख
बेळगाव :
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवणुकीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे चंदगडचे अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी जाहीरनाम्यामध्ये घालून सीमा वाशीयांची दखल घेतली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मराठी जनतेची काळजी घेत चंदगड मतदार क्षेत्रातील अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे सीमा प्रश्नबद्दल जाहीरनाम्यामध्ये घालून सीमावासीयांची दखल घेतली आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने सर्वच पक्षातील उमेदवारांना सीमा प्रश्नाचा उल्लेख जाहीरनाम्यामध्ये करावा अशी विनंती केली होती पण अनेक उमेदवारांनी याकडे दुर्लक्ष करत सीमावास्यांच्या भावना दुखावल्या आहेत पण चंदगड भागातील अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी न विसरता मराठी भाषेवर होणारा अन्याय पाहून सीमा प्रश्न सोडवणुकीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे जाहीरनाम्यामध्ये नमूद केले आहे. यामुळे बेळगाव भागातील मराठी भाषिकांनी चंदगड भागामध्ये असलेल्या पै पाहुण्यांना शिवाजी पाटील यांच्या पाठीशी राहण्याचे आव्हान प्राचार्य आनंद आपटेकर यांनी सीमा भागातील एक महाराष्ट्र एकीकरण समितीचे सीमा भाग वैद्यकीय समन्वयक या नात्याने आव्हान केले आहे.